Monday 6 April 2020

कोरोनाचा सामना करण्यासाठी रामदेव बाबांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय


नवी दिल्ली | जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतानं जोरदार कंबर कसली आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मदतनिधीला अर्थसहाय्य करण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे, त्यांच्या या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय.

पतंजली उद्योग समुहाचे सर्वोसर्वा आणि योगगुरु बाबा रामदेव यांनी देखील पंतप्रधान मदत निधीसाठी सढळ हाताने मदत केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. पतंजली समुहाने २५ कोटी रुपयांनी मदत केली आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारला आर्थिक मदतीची गरज आहे. दातृत्ववान दात्यांच्या मदतीशिवाय हे शक्य नाही. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदतीचं आवाहन केलं होतं. त्यांनी यासंदर्भात अकाऊंट डिटेल्सही शेअर केले होते.

No comments:

Post a Comment